Des Moines Shooting. (Photo Credits: Twitter)

अमेरिकेतील कॅलिफोर्निया (US California) येथील हाफ मून बे (Half Moon Bay) शहरात मंगळवारी (24 जानेवारी) गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाठिमागच्या काही दिवसांमध्ये कमी कालवधीत सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गोळीबाराची (Mass Shooting) ही दुसरी घटना आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबारात मृत्यू झालेल्यांमध्ये एका चिनी शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा शेतकरी 67 वर्षांचा असून त्याचे नाव झाओ चुनली (Zhao Chunli) असे आहे. आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. पळ काढताना त्याने आपल्या सहकाऱ्यांवरही गोळीबार केला. (हेही वाचा, America Firing: कॅलिफोर्नियामध्ये लूनर न्यू ईयर पार्टीदरम्यान गोळीबार; 10 ठार, 16 हून अधिक जखमी)

ट्विट

वृत्तसंस्था एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे ट्विट सॅन माटेओ काउंटी शेरीफ यांनी केले आहे.