Coronavirus: जगभरामध्ये COVID-19 संक्रमनामुळे 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू- जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चीनमधील कोविड 19 (COVID-19) विषाणून अर्थातच कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांकाच मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यात मंगळवार सकाळपर्यंत जगभरात 2,51,510 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

सद्यस्थितीत जगभराचा विचार करता कोरोना व्हायरस संक्रमन होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या युनायटेड स्टेट्स मध्ये म्हणजेच अमेरिकेत सर्वाधिक आहे. एकट्या अमेरिकेत 68,922 नागरिकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. सीएसएसआयने दिलेल्या आकडेवारीनुसार 20,000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये इटली (29,079) यूके (28,809) , स्पेन (25,428 ), फ्रान्स 25,204 आदी देशांचा समावेश आहे. (हेही वाचा, Coronavirus चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच COVID-19 निर्मिती, आमच्याकडे पुरावा; अमेरिकेचा दावा)

सीएसएसआयने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी कोरना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झालेल्या जगभरातील रुग्णांची संख्या 35,82,469 इतकी आहे याच आकडेवारीनुसार अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक 11,80,288 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. अमेरिकेनंतर स्पेन (218,011), इटली (211,938), यूके (191,832), फ्रांस (169,583), जर्मनी (166,152), रशिया (145,268), तुर्की (127,659) आणि ब्राजील (108,266) अशी क्रमवारी आहे.