चीन मधी वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात परसवले आहे. त्यामुळे विविध देशात ही कोरोना व्हायरस थैमान घालत असून दिवसेदिवस त्याच्या रुग्णांच्या संख्येसह मृतांचा आकडा वाढत आहे. चीन नंतर इटली येथे सर्वाधिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. मात्र आता अमेरिकेत सुद्धा कोरोना व्हायरसमुळे नागरिकांचा मोठ्या प्रमणात मृत्यू होत आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 188530 च्या पार गेला आहे. तर Covid 19 या आजाराने सुमारे 3800 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे सुमारे 1 ते अडीच लाख बळी जाऊ शकतात असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे.तर AFP न्यूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासात 1169 जणांना मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
अमेरिकेत प्रामुख्याने न्यूयॉर्क, न्यूजर्सी या भागात कोरोनाबधितांची संख्या अधिक आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाउनचे आदेश दिले होते पण त्यांनी ते मागे घेतले. अमेरिकेतील काही महत्वाच्या ठिकाणीच लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेत गेल्या 24 तासाच 1169 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 31 मार्चला कोरोना व्हायसरमुळे 24 तासात 865 जणांचा मृत्यू झाला होता.(Coronavirus: इस्त्राईलचे आरोग्यमंत्री याकोव लित्जमैन यांना कोरोना व्हायरस संक्रमन)
US virus deaths hit new daily high of 1,169 in 24 hours, Johns Hopkins University: AFP news agency #COVID19
— ANI (@ANI) April 3, 2020
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना व्हायरसची चाचणी पुन्हा निगेटिव्ह आली आहे. सध्या जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 858,669 पर्यंत पोहचला आहे. तर 42,000 हून अधिक बळी गेले आहेत. चीनमधून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने सुमारे जगातील 25% देश सध्या लॉकडाऊन आहेत. त्याचा आरोग्य क्षेत्रासोबतच जगाला मोठा आर्थिक फटकादेखील बसत आहे. येत्या काही काळात मोठ्या जागतिक आर्थिक मंदीलादेखील तोंड द्यावे लागणार असल्याचं सांगण्यात आले आहे.