दक्षिण कोरियात अमेरिकेच्या सैनिकाला कोरोना व्हायरसची लागण
कोरोना व्हायरसचा कहर (Photo Credits-IANS)

चीन(China) मधील वुहान शहरात लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे आता देशभरात पसरत चालले आहे. तर ताज्या अपडेटनुसार, दक्षिण कोरियात तैनात असलेल्या सैनिकाला कोरानाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच दक्षिण कोरियात कोरोना व्हायरसची संख्या वाढत चालली आहे. पण आशियाई देशात सैनिकाला कोराना झाल्याची ही प्रथमच बाब आहे. दक्षिण कोरियाचे सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन यांनी असे सांगितले की, दोएगू येथे 169 पैकी 134 नवी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर उत्तर ग्योंगसांग प्रांतातील शहरात सुद्धा 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेच्या सेनेकडून असे सांगण्यात आले आहे की, 23 वर्षीय सैनिक त्यांच्या निवास्थानी स्वतंत्र राहत आहेत. कोरोनाची लागण झालेला सैनिक हा दाएगू पासून 30 किमी उत्तर स्थित असलेल्या ठिकाणी तैनात होता. दक्षिण कोरियाचे अधिकारी आणि अमेरिका सेनेने आरोग्य विशेषज्ञांकडून कोरोनाची लागण झालेल्यांच्या बाबात अधिक माहिती मिळवत आहे. कारण अन्य जणांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे.(दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूची 60 नवीन प्रकरणे; चीननंतर सर्वात जास्त 893 व्यक्तींना लागण, देशात हाय अलर्ट जारी)

दक्षिण कोरियात अमेरिकेचे जवळजवळ 28,500 सैनिक तैनात आहेत. युनायटेड स्टेट्स फोर्सेस कोरिया यांनी आधीच सांगितले की, शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. दक्षिण कोरियाच्या 600,000 सेनेतील 18 प्रकरणे उघडकीस आली आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूच्या 1,146 रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.