चीननंतर कोरोना व्हायरस (Corona Virus) हळू हळू जगातील इतर देशांत पसरत आहे. जपान, इटली, इराण यांसह आता दक्षिण कोरियामध्ये (South Korea) या आजाराने हाहाकार माजवला आहे. दक्षिण कोरियामध्ये मंगळवारी, कोरोना विषाणूची 60 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत एकूण 893 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
कोरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ही बातमी दिली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना विषाणूची 800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे, रविवारी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी कोरोनासंदर्भात देशात अलर्ट जारी केला.
याबाबत मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली त्यानंतर अलर्ट जारी केला गेला. केसीडीसीने सांगितले, कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा आठवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, मात्र अजूनही सरकार त्यात अपयशी ठरत आहे. देशातील प्रगत वैद्यकीय प्रणाली याचा सामना करण्यासाठी झटत आहे. ताज्या घटनांपैकी 49 जण दक्षिणेकडील डेगू आणि त्याच्या शेजारील उत्तर जेओनसांग प्रांतातील आहेत. (हेही वाचा: Coronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू)
रविवारी दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूची 123 नवीन प्रकरणे नोंदली गेली. केसीडीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, दक्षिणेकडील देगू शहरातील शिंचंजी चर्च ऑफ ज्यूसमध्ये नवीन 75 संक्रमणांची प्रकरणे समोर आली. आता चर्चमधील शेकडो सदस्य संक्रमित झाले आहेत, ज्याची सुरुवात 61 वर्षाच्या महिलेपासून झाली. अडीच दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण कोरियामधील हे कोरोना विषाणूची लागण असलेले चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. या शहरात कोरोनामुळे बाधित एकूण संख्या 247 वर पोहोचली आहे. उत्तर गेयॉन्गसांग प्रांतातील स्थानिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला.