Coronavirus (Photo Credits: PTI)

चीनमध्ये (China) सुरु झालेल्या कोरोना व्हायरससे (Coronavirus) लोन आता जगातील इतर अनेक देशांत पसरले आहेत. नुकतेच इटलीच्या (Italy) आरोग्य मंत्र्यांनी देशात कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी शुक्रवारी सांगितले की, हा 78 वर्षीय ही व्यक्ती उत्तर वेनेटो प्रदेशात सुमारे दहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती.

इटलीमधील कोरोना विषाणूमुळे हा पहिला मृत्यू आहे. देशात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर, उत्तर लॉम्बार्डी भागातील दहा शहरांमधील सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद केली गेली आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. चीननंतर फिलिपिन्समध्ये कोरोना विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला, त्यानंतर, जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला.  याव्यतिरिक्त, दक्षिण कोरियामध्येही कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती आहे. कोराना विषाणू मध्य पूर्वातील बर्‍याच देशांमध्ये पसरला आहे. इराणमध्ये या आजाराने चार जणांचा मृत्यू झाला आहे. आता येथे 18 लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

(हेही वाचा: जपानमधील Diamond Princess जहाजावरील आणखी 79 जणांना Coronavirus चा संसर्ग; आतापर्यंत तब्बल 621 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण)

इराण व्यतिरिक्त कोरोनाने संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इस्त्राईल आणि लेबनॉनच्या लोकांनाही ग्रासले आहे. इराणमधील धार्मिक शहरात भेट देणारी एक 45 वर्षीय लेबनीज महिला या आजाराने बळी पडली. दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत 2239 लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे, तर 75,567 लोक या आजाराने ग्रासले आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी हुबेईमध्ये 414 नवीन घटनांची नोंद झाली. एकट्या हुबेईमध्ये मृतांचा आकडा 2,114 च्या वर पोहोचला आहे. चीनच्या तुरूंगातही कोरोना विषाणूची 400 पेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत.