जपान (Japan) किनारपट्टीवर उभ्या असलेल्या क्रूझ डायमंड प्रिन्सेस (Diamond Princess) वर अनेक लोकांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. मात्र आता यात अजूनच भर पडताना दिसत आहे. जहाजातील आणखी 79 लोकांना कोरोनाव्हायरस संसर्ग झाला आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या आकडेवारीनुसार आता जहाजात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 621 वर गेली आहे.
संसर्ग न झालेले लोक 14 दिवसांनंतर आपल्या घरी परतू लागले आहेत, अशावेळी आलेल्या या बातमीने अजूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जहाजावर एकूण 3,711 एकूण लोक आहे, त्यापैकी 138 भारतीय आहेत. भारतीयांमध्ये 132 क्रू मेंबर्स आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये ही एक चांगली बाबा आहे की, जहामधील ज्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही, अशांना जहाजातून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली आहे. हे जहाज 5 फेब्रुवारीला योकोहामा बंदरावर पोहोचले. या जहाजातून मलेशियात एका प्रवासी उतरला होता, ज्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजते. त्यानंतर हे जहाज 14 दिवस बंदरावर उभे होते. (हेही वाचा: Coronavirus : आईचा विमानातच मृत्यू; चीनमधून मृतदेह मुंबईत आणण्यासाठी 20 दिवसांपासून प्रतीक्षा, कोरोना व्हायरस करतोय मेहरा कुटुंबीयांची परवड, डॉ. मुलाचे पंतप्रधान मोदी यांना पत्र)
वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, बुधवारी प्रवासी बस आणि टॅक्सीमधून जहाजामधील अनेक प्रवासी आपल्या घरी गेले. दरम्यान, हा व्हायरस चीनमध्ये विनाश घडवून आणत आहे. आतापर्यंत दोन हजाराहून अधिक लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत, तर 74 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. चीन बाहेरील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची शेकडो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे कंबोडियाच्या किनाऱ्याजवळ उभे असलेल्या वेस्टरडॅम नावाच्या जहाजातूनही प्रवासी आता बाहेर पडत आहेत. या जहाजात असलेल्या लोकांनाही कोरोना विषाणूबाबत भीती होती.