Puneet Mehra | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) शहरातील एका कुटुंबासाठी कोरोना व्हायरस (Coronavirus) परवड करणारा ठरला आहे. मुंबई येथील वांद्रे परिसरात राहणाऱ्या डॉ. पुनित मेहरा (Puneet Mehra) यांच्या मातोश्री रिटा राजेंद्र मेरहा (वय-63) यांचा विमान प्रवासादारम्यान चीनमध्ये मृत्यू (Mumbai Woman Dead body at China) झाला. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृतदेह मेहरा कुटुंबीयांना भारता आणणने मुश्किल झाले आहे. आईचा मृतदेह भारतात आणावा यासाठी डॉ. पुनित मेहरा आणि त्यांचे कुटुंबीय गेले 20 दिवस प्रतिक्षेत आहेत. कोरोना व्हायरस पसरण्याच्या भीतीपोटी भारत-चीन विमानसेवा बंद आहे. त्याचा फटका मेहरा कुटुंबीयांना बसला आहे. दरम्यान, डॉ. पुनीत मेहरा आणि कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्र मंत्रालय आणि बीजिंगमध्ये भारतीय राजदूताला पत्र लिहिले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून आईचा मृतदेहा स्वदेशी आणण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, डॉ. पुनित मेहरा हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना घेऊन भारतात येण्यासाठी त्यांच्या 63 वर्षांच्या आई मातोश्री रिटा राजेंद्र मेहरा मेलबर्नला गेल्या होत्या. दरम्यान, भारतात परतण्यासाठी डॉ. पुनित आणि त्यांच्या आई 24 जानेवारी 2020 या दिवशी विमानाने बीजिंगमार्गे मुंबईला निघाले. दरम्यान, विमानप्रवासातच रीटा यांचा मत्यू झाला. विमान प्रवासादरम्यान रीटा या विमानातील वॉशरुममध्ये गेल्या. मात्र, बराच वेळ त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शंका आल्याने डॉ. पुनीत यांनी पाहणी केली असता त्या बेशुद्ध आवस्थेत आढळल्या. रीटा यांच्यावर उपचार करण्यासाठी चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. परंतू, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचार करताना व्हायरसची लागण होऊन डॉक्टरांचा मृत्यू)

एएनआय ट्विट

घडल्या प्रकारानंतर डॉ. पुनित 7 फेब्रुवारी या दिवशी भारतात आले. त्यांनी आईचे पार्थिव आणण्यासाठी भारतातून प्रयत्न सुरु केले. सध्या स्थितीत रीटा यांचे पार्थिव झेंगझोऊ येथी शवागरात ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये आरोग्य आणिबाणी असल्याने पार्थीव भारतात आणण्यास विलंब होत आहे, असे डॉ. पुनीत यांनी म्हटले आहे.

7 फेब्रुवारी रोजी डॉ. पुनित भारतात परत आले. मात्र त्यांच्या आईचं पार्थिव आजही झेंगझोऊमधील शवगृहात ठेवण्यात आलं आहे. चीनमधील परिस्थिती गंभीर असल्याने पार्थिव आणण्यात विलंब होत असल्याचं डॉ. पुनित यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या आईचं पार्थिव कधी मायदेशी येणार, याची वाट शोकाकुल मेहरा परिवार वाट पाहत आहे.