Coronavirus Outbreak: स्पेन मध्ये 24 तासात 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; देशात आतापर्यंत 6,528 बळी
कोरोना व्हायरस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोरोनामुळे (Coronavirus) जगभरावर ओढवलेले संकट दिवसागणिक तीव्र रूप धारण करत आहे. चीन (China), इटली (Italy) नंतर आता स्पेन (Spain) मध्ये सुद्धा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. AFP या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील अवघ्या 24 तासात स्पेन मध्ये तब्बल 838 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत देशात तब्बल 6,528 नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. संबंधित आकडेवारी स्पेनच्या आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे. दुसरीकडे शनिवारी, स्पेनचे राजे फिलीप IV यांची चुलत बहिण राजकुमारी मारिया टेरेसा (Princess Maria Teresa) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मारिया 86 वर्षांच्या होत्या. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या मारिया या राजघराण्यातील पहिल्या बळी ठरल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने स्पेन मध्येही दहशत माजवली आहे. चीन, इटली नंतर स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. स्पेन मध्ये आतापर्यंत 78 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे साहजिकच स्पेन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, इटलीतील कोरोना व्हायरसच्या मृतांचा  आकडा 10 हजारावर पोहला आहे. याबाबत अधिक माहिती AFP यांनी दिली आहे.  कोरोनामुळे इटलीत गेल्या 24 तासात जवळपास 1000 नागरिकांचा बळी गेला.

ANI ट्विट

दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 1024 वर पोहचला आहे. कोरोनाचा आजार वेगाने पसरत असला तरी यातून रिकव्हर होणाऱ्यांचे आकडे सुद्धा तितकेच आश्वासक आहेत. भारतात आतापर्यंत 80 जणांना कोरोनापासून ठणठणीत बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे.