Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

कोरोना व्हायरस (Coronavirus) या संकटाचा सामना संपूर्ण जग करत आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा कहर चीनपेक्षा इटली (Italy) आणि स्पेन (Spain) मध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये कोरोनाचे दाहक स्वरुप पाहायला मिळत आहे. दर दिवशी इटलीत 800 च्या वर मृत्यूचा आकडा जात आहे. मृतांना दफन करण्यासाठी जागा कमी पडत असून या महामारीला कसे सामोरे जावे या चिंतेत इटली सरकार आहे. गेल्या 24 तासांत इटली मध्ये कोरोना व्हायरसमुळे 812 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे थैमान घातलेल्या इटलीत आता मृतांचा आकडा 11,591 झाला आहे. त्यामुळे 3 एप्रिल पर्यंत असणारा लॉकडाऊन आता 12 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. (COVID-19: इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद)

इटली, स्पेन, इराण या देशांत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. त्यानंतर अमेरिकेतही गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2,484 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1,24,686 हून अधिक लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी सुमारे 2 हजार लोक बरे झाले आहेत.

AFP News Agency Tweet:

संपूर्ण जगात थैमात घातलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगात 35000 लोकांचा बळी घेतला आहे.

स्पेन मध्ये  6,803 तर चीनमध्ये 3,300 लोकांचा मृत्यू  कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे घाबरुन न जाता सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. तसंच सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सामुहिक सहकार्यातून कोरोना व्हायरस या जागतिक संकटावर मात करता येईल.