प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Wikimedia Commons)

माजी मध्यम-धावपटू डोनाटो साबिया (Donato Sabia) यांचे वयाच्या 56 व्या वर्षी कोविड-19 पासून निधन झाले आहे, इटालियन ऑलिम्पिक समितीने (Coni) जाहीर केले आहे. इटलीच्या ऑलिम्पिक संघटनेच्या (Italian Olympic Committee) म्हणण्यानुसार 1984 च्या ऑलिम्पिकमध्ये पाचवे आणि 1988 च्या ऑलिम्पिकमध्ये सातवे स्थान मिळविणारे साबिया जगातील पहिले ऑलिम्पिक फायनलिस्ट आहेत. साबियाने दोन वेळा ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला आणि 1984 मध्ये युरोपियन इंडोर चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. कोनी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साबिया यांनी काही दिवसांपासून दक्षिण इटालियनच्या बासिलिकाटा भागातील पोटेन्झा येथील सॅन कार्लो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 13 जून 1984 रोजी फ्लोरेन्समध्ये साबियाचा वैयक्तिक सर्वोत्तम 1: 43.88 असा इटालियन अंडर-23 रेकॉर्ड अजूनही कायम आहे. (Coronavirus: अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 बाधित तब्बल 2,000 नागरिकांचा मृत्यू)

इटालियन अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचे (फिडल) अध्यक्ष अल्फियो जिओमी यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की,“ही शोकांतिका आहे. डोनाटो एक अशी व्यक्ती होती ज्यांना आपण फक्त प्रेम करू शकत होतात.”

साबिया बेसिलिकाटामध्ये फिदालच्या प्रादेशिक समितीचे अध्यक्ष होते. साबिलियाच्या मृत्यूची नोंद बेसिलिकाटामध्ये फक्त 15 वी होती. व्हायरसमुळे इटलीमध्ये 17,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार जगात इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू 17,669 झाले आहेत. इटलीने व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी 9 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउन जाहीर केला. चीन मधून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं थैमान मागील तीन महिन्यात जगभर पसरलं आणि आता या कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या 88,000 च्या वर पोहचली आहे.