Coronavirus: जगभरातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 55 लाखाच्या जवळ; 3 लाख 46 हजारांहून अधिक मृत्यू; अमेरिका, ब्राझिल, रशिया, इंग्लंड आघाडीवर
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची जगभरातील संख्या वाढणे अद्यापही सुरुच आहे. आजघडीला जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 55 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तर कोरना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 3 लाख 46 हजारांहून अधिक झाली आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीने ही आकडेवीरी दिली आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (CSSE) ही आकडेवारी देत असते. सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवार सकाळपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 54 लाख 94 हजार 287 इतकी तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 3 लाख 46 हजार 229 इतका झाला आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येचा विचार करायचा तर अमेरिका सर्वात अव्वल आहे. एकट्या अमेरिकेत कोरोना मुळे झालेल्या मृत्यूची संख्या जवळपास 1 लाखांपर्यंत पोहोचली आहे. आजघडीला अमेरिकेत 98 हजार 218 नागरिकांची मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. तर 16 लाख 62 हजार 302 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे.

दरम्यान, कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीत अमेरिकेच्या खालोखाल ब्राझिल या देशाचा समावेश होतो. ब्राझिलमध्ये 3 लाख 74 हजार 898 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 53 हजार 427 रुग्णसंख्येसोबत रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, Hydroxychloroquine and Coronavirus: सुरक्षेच्या कारणास्तव WHO ने थांबवली हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कोरोना व्हायरस उपचारातील चाचणी)

विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या

 1. अमेरिका- 16 लाख 62 हजार 302
 2. ब्राझिल- 3 लाख 74 हजार 898
 3. रशिया- 3 लाख 53 हजार 427
 4. इग्लंड- 2 लाख 62 हजार 547
 5. स्पेन- 2 लाख 35 हजार 400
 6. इटली- 2 लाख 30 हजार 158
 7. फ्रान्स- 1 लाख 83 हजार 67
 8. जर्मनी- 1 लाख 80 हजार 600
 9. तुर्की- 1 लाख 57 हजार 814
 10. भारत - 1 लाख 44 हजार 950
 11. इराण - 1 लाख 37 हजार 724
 12. पेरु - 1 लाख 23 हजार 979

सीएसईच्या आकडेवारीनुसार जागतिक आकडेवारीबाबत बोलायचे तर 36 हजार 996 नागरिकांच्या मृत्यू सोबत इंग्लड हा अमेरिकेनंतर देशातील दुसरा देश ठरला आहे. सर्व यूरोपीय दशांमध्ये हा आकडा सर्वात मोठा आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या पाहता इटली- 32 हजार 877, फ्रान्स- 28 हजार 460, स्पेन- 26 हजार 834, ब्राझील या देशात 23 हजार 473 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे