Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाबाधित रुग्णांपासून दूर राहण्याचे ही सांगण्यात येत आहे. मात्र पाकिस्तान येथे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेणाऱ्या 6 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडिकल टेस्टमध्ये कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेत होते असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानात रविवार पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 750 वर पोहचली आहे. डॉन न्यूज यांच्या रिपोर्टनुसार, खैरपूर जिल्ह्यातील डेप्युटी कमिश्नर यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेत होते. त्यामुळे विविध क्षेत्रात तैनात असलेल्या 6 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसोबत सेल्फी घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.(Coronavirus ने अमेरिका हादरली; 24 तासात 100 हुन अधिक मृत्यू)

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्यक्ती हा इराण येथून परतला होता. एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या नुसार असे म्हटले आहे की, इराण येथून परतलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यासोबत सेल्फी घेत होते. मात्र सेल्फी घेताना त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण दिसून आली नव्हती. सेल्फीचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ज्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीसोबत सेल्फी घेतले त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. त्याचसोबत पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी देशात पूर्णपणे लॉकडाउन करता येणार नसल्याचे म्हटले आहे. कारण येथील 20 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हे द्रारिद्र रेषेखालील आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हूनच घरी रहावे असे आवाहन इमरान खान यांनी केले आहे.