Chinese Hackers Target India Serum Institute, Bharat Biotech: भारतीय कोरोना लसीवर सायबर हल्ला, चीनी हॅकर्सकडून फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

Chinese Hackers Target India Serum Institute, Bharat Biotech: कोरोना लस बनविणार्‍या भारतीय कंपन्यांना सध्या चिनी हॅकर्सचे लक्ष्य बनल्या आहेत. भारतातील कोरोना लसीकरण दरम्यान हॅकर्संनी भारतीय लस उत्पादकांच्या आयटी प्रणालीला लक्ष्य केले. चीनी हॅकर्सने भारतीय लस उत्पादकांची आयटी प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. हॅकिंगचा हा प्रयत्न चीन समर्थीत हॅकर्सच्या एका गटाने केला आहे. रॉयटर्सने सायबर इंटेलिजेंस फर्म Cyfirma चा हवाला देत म्हटलं आहे की, देशाच्या लसीकरण मोहिमेमध्ये ज्या दोन लसीचा वापर करण्यात येत आहे. त्या लसीची आयटी प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हॅकर्सचा उद्देश भारताची कोरोना लस पुरवठा साखळी खंडित करणे आहे.

अहवालानुसार, चीन समर्थीत हॅकर्सच्या गटाने गेल्या आठवड्यात कोरोना लस बनवणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या आयटी सिस्टमला लक्ष्य केले. यामध्ये भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एसआयआय चा समावेश आहे. हॅकर्सनी या कंपन्यांच्या आयटी सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. (वाचा - COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; जनतेला केलं लस घेण्याचं आवाहन)

सिंगापूर आणि टोकियो येथील सायबर इंटेलिजेंस फर्म Cyfirma ने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी हॅकर्स APT10 यास स्टोन पांडा म्हणून ओळखले जाते. त्यांनी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि भारताच्या बायोटेक आणि एसआयआयसाठी पुरवठा साखळी सॉफ्टवेअरमध्ये कमतरता शोधण्याचा प्रयत्न केला. सीरम इन्स्टीटूड जगातील बर्‍याच देशांसाठी लस तयार करत आहे.

विशेष म्हणजे भारत आणि चीन हे दोन्ही देश वेगवेगळ्या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करत आहेत. जगभरात विकल्या जाणार्‍या सर्व लसींपैकी 60% पेक्षा जास्त लसीचा पुरवठा भारतातून केला जात आहे. त्यामुळे चीनला भारताची कोरोना लस पुरवठा साखळी खंडित करायची होती. म्हणूनचं हॅकर्सनी भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टमला लक्ष्य केले.

दरम्यान, या मुद्द्यावर चिनी दूतावासाकडून निवेदन आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सायबर सुरक्षेचा बचाव करणारा चीन कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याला कडाडून विरोध करतो. सायबर हल्ल्याच्या मुद्यावर, पूर्वीचे समज किंवा अनुमान लावण्याचे कोणतेही स्थान नसावे. पुरेसे पुरावे नसल्यास एखाद्यावर आरोप करणे हे बेजबाबदार वर्तन आहे.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने नोव्हेंबरमध्ये म्हटले आहे की, रशिया आणि उत्तर कोरिया कडून COVID-19 लस भारत, कॅनडा, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील लस कंपन्यांना लक्ष्य केले आहे. उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी देखील ब्रिटीश औषध निर्माता अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या यंत्रणेत घुसण्याचा प्रयत्न केला.