श्रीमंतांच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगात अव्वल; पहा भारताची स्थिती
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनमधील (China) श्रीमंतांची संख्या प्रथमच अमेरिकेपेक्षा (USA) जास्त झाली आहे. आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट स्विसने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील पहिल्या दहा टक्के श्रीमंतांमध्ये चीनच्या 10 कोटी लोकांचा समावेश आहे, तर यामध्ये अमेरिकन लोकांची संख्या 9.9 कोटी इतकी आहे. अहवालानुसार, लक्षाधीशांच्या संख्येत अमेरिका अजूनही पुढे आहे. अमेरिकेत 1.86 कोटी लक्षाधीश आहेत. जगभरातील कोट्यधीशांपैकी हे 40% आहे. चीनमध्ये लक्षाधीशांची संख्या 44 लाख इतकी आहे. अमेरिकेत लक्षाधीशांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कमी व्याज आणि कर कमी केल्यामुळे अमेरिकन लोकांची संपत्ती वाढत आहे.

क्रेडिट स्विसने सांगितले की, सरासरी अमेरिकन लोक चीनमधील लोकांपेक्षा श्रीमंत आहेत. अमेरिकेत प्रति युवा मालमत्ता 4 लाख 32 हजार 365 डॉलर्स इतकी आहे, तर चीनमध्ये 58 हजार 544 डॉलर्स इतकी आहे. परंतु या बाबतीत चीन युरोपपेक्षा वेगाने वाढत आहे. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, चीनमधील व्यवसायाची स्थिती आणि कर्जाची पातळी चिंताजनक आहे, परंतु येणाऱ्या काही वर्षांत याबाबत सकारात्मक चिन्हे दिसत आहेत.

अर्थव्यवस्थेतील मंदी असतानाही गेल्या एका वर्षात भारतातील घरगुती मालमत्ता दुपटीने वाढली आहे. आर्थिक वाढीचा दर हा पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर असून, सध्या तो 5..8% आहे. क्रेडिट स्विसच्या मते, 2019 मध्ये घरगुती मालमत्ता 12.6 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. सन 2018 मध्ये देशांतर्गत संपत्ती 5.972 ट्रिलियन होती. 2000 ते 2019 दरम्यान देशातील देशांतर्गत संपत्ती चार पट वाढली आहे. अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत मालमत्तेत आणखी 4.4 ट्रिलियन डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: येत्या 8 वर्षांत चीनला मागे टाकत भारत होईल सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश: UN Report)

दरम्यान, आर्थिक गुंतवणूक, मालमत्ता, सोने इत्यादींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार भारतीयांवर दरडोई, 14,569 डॉलर्सचे कर्ज आहे. यावर्षी कर्जाची रक्कम 120 अब्ज डॉलर्सने वाढली आहे, त्यात 11.5% वाढ झाली आहे. आर्थिक मालमत्तेत 1.4% आणि बिगर-आर्थिकमध्ये 6.9% वाढ झाली आहे.