British Parliament: संसदेत XXX क्लिप पाहणाऱ्या ब्रिटीश खासदाराचा राजीनामा, म्हणाले 'तो एक Moment of Madness'
Neil Parish | (Photo Credits: Facebook)

ब्रिटीश संसदेत (British Parliament) मध्ये पॉर्न क्लिप ( XXX Clip ) पाहणारे खासदार नील पैरिश (Neil Parish) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या आधी पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM boris Johnson) यांच्या कंजर्वेटीव पार्टी (Conservative Party) मधून त्यांना पैरिश यांना पक्षातून निलंबीत केले. त्यानंतरत या खासदाराने आपण 'हाऊस ऑफ कॉमन्स' मध्ये 'वेडेपणाच्या क्षणी' आपण पोर्नोग्राफी पाहिल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.

संसदेतील प्रथा, परंपरा आणि संकेत यांचे पालन करण्याबाबतच्या विभागाच्या आयुक्तांना तक्रार केल्यानंतर कंजर्वेटीव्ह पक्षाने शुक्रवारी नील पॅरीश यांना निलंबीत केले. निलंबीत झाल्याच्या पुढच्याच दिवशी दिन पॅरीश यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी सुरुवातीला म्हटले होते की, पक्षाने निलंबीत केले तरी आपण खासदार म्हणून कायम राहू. जरी आपल्याविरोधात चौकशी सुरु ठेवली तरीही आपण कायम राहू. (हेही वाचा, Shocking! संसदेत महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान मोबाईलमध्ये Porn Video पाहताना आढळले खासदार; चौकशी सुरु)

दरम्यान, बीबीसीने दिलेल्या एका मुलाखतीत साश्रुनयनांनी पॅरीश यांनी म्हटले की, माझ्या कृतीमुळे माझे कुटुंबीय आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यावरुन सध्या जो हंगामा लागला आहे. तो पुढे चालू नये. दरम्यान, पॅरीश यांनी संसदेत केलेल्या गैरकृत्यावरुनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पैरिश हे एक शेतकरी आहेत. त्यांनी म्हटले की, त्यांनी आयुष्यात यापूर्वीही एकदा चुकून अशा प्रकारची बेवसाईट पाहिली होती. एक वेबसाईट शोधताना चुकून नामसाधर्म्यामुळे आपण चुकून त्या साईटवर गेलो होता. आताही आपल्याबाबत असेच घडल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, मी असे करायला नको होते असेही ते म्हणाले.

पैरिश यांनी म्हटले की, माझी सर्वात मोठी चूक होती की, मी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा पाहिला. तो पाहताना माझे ठिकाणही चुकले. माझ्याकडून ही चूक जाणूनबुजून घडली असेही त्यांनी मान्य केले. माझ्याकडून तो एक वेडेपणाचा क्षण घडला असेही ते म्हणाले. मी जे केले त्यावेळी मला जराही जाणीव नव्हती की आजूबाजूचे लोक मला पाहतील.