Black Panther Stuntman Died: एका घटनेमुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ब्लॅक पॅंथर आणि अॅव्हेंजर्सवरिल त्याच्या कामासाठी प्रसिध्द असलेला स्टंटमॅन ताराजा रैमसेस याचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. जॉर्जिया हायवेवर कार अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. टॅक्टर ट्रलीच्या धडकेत ताराजाचा तीन मुलांसह मृत्यू झाला आहे. हेलोवीनच्या रात्री डेकाल्ब काउंटीमधील पिकअप ट्रकमध्ये आपल्या पाच मुलांसह प्रवास करताना हा घात झाला.
हेही वाचा- लाईव्ह स्ट्रिम दरम्यान अॅकरची हत्या, फिलीपाईन्स येथील घटना
ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेनंतर ताराजाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर प्रशासन अधिकारी तपास करत आहे. या घटनेतील दोघे मुले वाचले असून ते गंभीर अवस्थेत रुग्णालयात असल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. ताराजा सोबत सुंदरी (13 वर्षीय मुलगी), किसाकी(10 वर्षाचा मुलगा) आणि (फुजी) नवजात चिमुकल्यचा मृत्यू झाला आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर हॉलिवूड क्षेत्रातत मोठी शोककला पसरली आहे. ताराजा यांच्या आई अकिलीने या संदर्भता माहिती देत शोककला व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटना स्थळी दाखल झाले. या सदंर्भात पोलिस तपासणी सुरु आहे. या घटनेनंतर शहरात मोठी शांतता पसरली आहे.