जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मायक्रोसॉफ्ट(Microsoft) कंपनीचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी आता आपल्याच कंपनीच्या संचालक मंडळातील पदाचा राजीनामा दिला आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यामागचा गेट्स यांचा हेतू हा निश्चितच कौतुकास्पद आहे. गेट्स यांना यापुढे जागतिक आरोग्य, शिक्षण आणि एकूणच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यायचे आहे. अशावेळी जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहू नये म्ह्णून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजतेय. मात्र गेट्स यांनी राजीनामा दिला असला तरी सुद्धा ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत. Microsoft संस्थापक Bill Gates यांनी सांगीतली आयुष्याती सर्वात Greatest Mistake; ज्याचा त्यांना होतो पश्चाताप
बिल गेट्स यांच्या निर्णयाबाबत मायक्रोसॉफ्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत".
या निर्णयानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या सहित कंपनीच्या संचालक मंडळातील अधिकाऱ्यांची संख्या 12 झाली आहे. "बिल गेट्स यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही अभिमानास्पद बाब आहे, त्यांचं ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कंपनी काम करत राहिल, संचालक मंडळाच्या सदस्यांना बिल गेट्स यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. मी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यातही हातभार लावू इच्छितो,” बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर अशी प्रतिक्रिया सत्या नडेला यांनी दिली आहे.
बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती, त्यांनतर त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून देण्याचा निर्णय घेतला होता.