Bill Gates Sr (Photo CRedits: @BillGates)

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचे वडील William H. Gates यांचे अमेरिकेमध्ये निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. दरम्यान त्यांची ओळख Bill Gates Sr अशी होती. पेशाने वकील असणार्‍या बिल गेट्स सिनियर यांनी 14 सप्टेंबर दिवशी अमेरिकेत Seattle भागात असणार्‍या त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान गेट्स कुटुंबाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांना अल्झायमर आजाराचा त्रास होता. त्याच्या विरूद्ध लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. Bill Gates Sr यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये 30 नोव्हेंबर 1925 दिवशी झाला होता.

बिल गेट्स यांनी ट्वीटरच्या माध्यमातून वडिलांचं स्मरण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'माझे वडील खरे बिल गेट्स होते. मी त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो. त्यांची कमी नेहमीच जाणवेल' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बिल गेट्स ट्वीट

न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार, Bill and Melinda Gates Foundation या जगातील महत्त्वाच्या सेवाभावी संस्थेच्या उभारणीमध्ये बिल गेट्सच्या वडिलांचा देखील मोलाचा वाटा होता. एकदा सिनेमा पाहताना बिल गेट्स आणि त्यांच्या वडीलांसोबत संवाद साधताना यांना आपण समाजासाठी काही पाहिजे याची जाणीव प्रकर्षाने झाली आणि त्यातून Bill and Melinda Gates Foundation उभी राहिली असं बिल गेट्स यांनी एकदा सांगितलं होतं. दरम्यान बिल गेट्स सिनियर यांनी 1994 साली आपला वकिलीचा पेशा सोडला होता.