Imran Khan (Photo Credits-Twitter)

अमेरिकेच्या (US) दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचे काही सुरळीत सुरु नाही आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तनच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र पाकिस्तानसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर बिल गेट्स (Bill Gates) आता आर्थिक मदत करणार आहेत. बिल अॅन्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) यांच्या तर्फे पाकिस्तानला 200 मिलियन डॉलर्सची मगत करण्यात येणार आहे.

रेडियो पाकिस्तान यांच्या मते, गुरुवारी बिल गेट्स यांच्यासोबत इमरान खान यांनी एक एमओयू (MOU) साइन केला आहे. बिल गेट्स यांच्याकडून देण्यात येणारा हा सर्व पैसा पाकिस्तानमधील गरिबीच्या विरोधात सुरु असलेल्या 'एहसास' या अभियानासाठी मिळणार आहे. येत्या 2020 पर्यंत हे सर्व पैसे खर्च करण्यात येणार आहेत. इमरान खान यांच्या मते, पाकिस्तानमधून या अभियानाच्या माध्यमातून देशातील गरिबी हटवण्यात येणार आहे. बिल गेट्स यांनी केलेल्या मदतीमुळे इमरान खान यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तसेच आर्थिक मंदीची लाट आल्याने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. विकासाला प्राधान्य देणारे इमरान खान सुद्धा यापूर्वीच्या पंतप्रधानांनसारखे वागत आहेत. म्हणजेच आर्थिक गोष्टी सुधारण्यापेक्षा दहशतवादालाच जास्त पाळत आहेत. सध्याची पाकिस्तानची परिस्थिती अधिक कर्जात बुडाल्यासारखी झाली आहे.(पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट; डिझेल पेक्षा दुधाचे भाव अधिक)

देशाचा कारभार चालवण्यासाठी पाकिस्तान अन्य देशांकडून सातत्याने कर्ज घेत आहे. मार्च 2019 पर्यंत पाकिस्तानवर 85 बिलियन डॉलर्स म्हणजेच 6 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. पाकिस्तानने पश्चिम युरोप आणि मध्य पूर्व देशांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम घेतली आहे. सर्वात जास्त चीनकडून पाकिस्तानला कर्ज देण्यात आले आहे.