Pakistan Bans Holi: पाकिस्तानात (Pakistan) अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. ते कुणापासूनही लपलेले नाहीत. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या सतत येत असतात. पाकिस्तानातून पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानमधील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये होळी (Holi) साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज एका वृत्ताचा हवाला देत पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (Pakistan Higher Education Commission) हा आदेश जारी केला आहे. या निर्णयामागे बेताल तर्क देण्यात आला आहे. अशा प्रकारचे उपक्रम देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न असून ते देशाच्या इस्लामिक अस्मितेच्या विरोधात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.
कायद-ए-आझम विद्यापीठात नुकतीच होळी साजरी झाली असताना उच्च शिक्षण आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 12 जून रोजी कॅम्पसमध्ये होळी साजरी झाल्यानंतर आणि घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानातील विद्यापीठांमध्ये होळी खेळण्यावर तसेच इतर हिंदू सण साजरे करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. (हेही वाचा - लश्कर-ए-तैयबाच्या Sajid Mir याला दहशतावादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध, फारताने नोंदवाल तीव्र निषेध)
Holi celebrations in Quaid-I-Azam University Islamabad Pakistan 🍁
Biggest holi celebration in Pakistan 💓 pic.twitter.com/xdBXwYEglt
— QAU News (@NewsQau) June 13, 2023
कायद-ए-आझम विद्यापीठात होळी साजरी करण्याच्या घटनेमुळे चिंता वाढली असून देशाची प्रतिमा खराब झाली, असे आयोगाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना अशा सर्व उपक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.