Baba Vanga's Predictions For 2021: बाबा वैंगा यांची भविष्यवाणी- 2021 मध्ये जग करेल प्रलयाचा सामना
Baba Vanga predictions (Photo Credits: Wikimedia Commons, Pixabay)

बाबा वैंगा (Baba Vanga) यांनी सन 2021 बाबत भविष्यवाणी (Baba Vanga's Predictions For 202 केली आहे. सन 2021 मध्ये जग एका महाप्रलयाला (Mahapralaya) सामोरे जाईल. हा महाप्रलय आणि संपूर्ण 2021 हे साल जगासाठी धोकादायक असेल. महत्त्वाचे असे की, बाब वैंगा यांचे 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 9/11 च्या हल्ल्याबाबत, ब्रैक्झिट संकटासोबतच जगभरात घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांबाबत केलेली भविष्यवाणी अनेकदा वास्तवापर्यंत पोहोचल्याचे मानले जाते.

वैंगा बाबा यांनी 2021 बाबतही अशीच महत्त्वपूर्ण भविष्यावणी केली आहे. या भविष्यवाणीत ते म्हणतात या वर्षात जग महाप्रलय आणि इतरही अनेक संकटांना सामोरे जाईल. एक मोठा ड्रॅगन (Dragon) जगावर कब्जा करेन. याशिवाय निसर्गातील तेल, पेट्रोलिय उत्पादन खंडीत होईल. पृथ्वीवरील द्रव पदार्थ सुर्य किरणांमुळे मोठ्या प्रमाणावर हवेत उडून जाईल. (हेही वाचा, Buldhana Bhendwal Bhavishyavani: यंदाची भेंडवळ भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पाऊस, पीक पाणी ते राजकीय, आर्थिक संकटाचे काय आहेत अंदाज?)

बाबा वैंग यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबाबतही भाष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांना एक रहस्यमय आजार होईल. ज्यामुळे ते बाहेर होतील. त्यांना ब्रेन ट्रॉमा होऊ शकतो. तर पुतीन यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता बाबा वैंग यांनी आपल्या भविष्यवाणीत वर्तवली आहे. पुतीन यांच्यावर रशियातीलच कोणीतरी हल्ला करेल असे म्हटले आहे. युरोपवर इस्लामी कट्टरवादी हल्ला करतील असेही बाबा वैंग यांनी म्हटले आहे.