Coronavirus (Photo Credits: Pixabay)

युरोपात एकीकडे कोरोना वायरसची (Coronavirus) दुसरी लाट डोकं वर काढत असताना आता ऑस्ट्रेलियामध्ये आज (1 नोव्हेंबर) स्थानिकांमध्ये पहिल्यांदाच नवा रूग्ण कोरोनाबाधित असल्याचं नमूद झालेलं नाही. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री Greg Hunt यांनी आज ही माहिती देताना नागरिकांचे, आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत. दरम्यान मागील 5 महिन्यात म्हणजेच 9 जून पासून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे नव्याने कोरोनाबाधितांचा एकही रूग्ण आढळला नसल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलिया (Australia)  साठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. काही महिन्यांपूर्वीच न्युझिलंडनेही स्थानिकां मध्ये म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशनवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता.

Greg Hunt यांचे ट्वीट

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मधील व्हिक्टोरिया या राजधानीच्या शहरामध्ये देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचि संख्या होती. आता तेथे कॅफे, बार, रेस्टॉरंट्स खुले करण्यात आले आहेत. शहरात केवळ एकच असा रूग्ण आहे ज्याला कोरोनाची लागण कुठून झाली याची माहिती नाही. सध्या 61 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आ हेत. Australia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण.

पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये केवळ एक रूग्ण आहे मात्र त्याला देखील लागण आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या व्यक्तीकडीन संसर्ग झाला आहे. तर परदेशातून आलेली एक स्त्री कोरोनाबाधित आहे. मात्र तिलादेखील क्वारंटीन करण्यात आले आहे.