AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine ची प्रथमच 6 ते 17 वयोगटातील मुलांवर चाचणी
Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (COvid-19) वरील लसीची आता लहान मुलांवर सुद्धा चाचणी करण्यात येणार असल्याची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) जाहीर केले आहे. ही लस वय वर्ष 6-17 या वयोगटातील मुलांना देण्यात येणार असून मुलांवर याचा होणारा परिणामाची तपासणी केली जाईल. प्रथम टप्प्यात सुमारे 300 मुलांना लस देण्यात येणार असून या महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रीया सुरु होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरस काळात बहुतांश मुलांना कोविड-19 ची लागण झाली नव्हती आणि लागण झालेल्या मुलांपैकी बहुतेक मुलं लवकर बरी झाली. यामुळे लहान मुलं आणि तरुणांमध्ये लसीकरणाचा सकारात्मक परिणाम येणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणामुळे लहान मुलं व तरुणांची प्रतिकारशक्ती वाढेल, असे लसीकरण मोहिमेचे चीफ इंन्व्हेसिगेटर Andrew Pollard यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने बनवलेल्या लसीच्या लसीकरण मोहिमेला स्थगिती मिळाली होती. काही प्रभागांमध्ये या लसीचा कोणताही परिणाम दिसून आला नसल्याने ही स्थगिती करण्यात आली होती. परंतु, स्थगिती आता उठवली असून लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. (Oxford COVID-19 Vaccine सर्वसामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत 'या' किंमतीत उपलब्ध होईल; SII CEO अदर पुनावाला यांची माहिती)

साऊथ कोरियामध्ये प्रौढ व्यक्तींवर कोरोना व्हायरसच्या लसीचा कोणताही परिणाम दिसून न आल्यामुळे तेथील प्रौढ व्यक्तींना लस घेण्यापासून सावध राहण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे भारत आणि युनाटेड किंगडम अशा देशांमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफर्ड लस मोठ्या प्रमाणावर दिली जात असून लसीकरण मोहिम अगदी सुरळीत चालू आहे.