Crude Oil (Photo Credits: AFP)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेला जागतिक आरोग्य संकटासोबतच मोठा आर्थिक फटका बसलेला पहायला मिळाला आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मागील महिन्याभरापासून व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. अमेरिकेसोबतच निम्मं जग लॉकडाऊन असल्याने अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमती 0.01 डॉलर प्रति बॅरल इतकं खाली घसरलं आहे. अमेरिकन मानक वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआई) तेलाची किंमत -37.63 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या विळख्यातून महासत्ता अमेरिकेचाही बचाव होऊ शकलेला नाही. सध्या कोरोना व्हायरस अमेरिकेत थैमान घालत असून कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या संख्या 40 हजारांच्या पार आहे. BSE Sensex Update: शेअर बाजार लाल निशाणावर उघडताच सेंन्सेक्स, निफ्टी मध्ये मोठी घसरण.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाला पाहता जगभरात अमेरिका, आशिया, युरोप खंडातील अनेक विकसित आणि विकसनशील देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जगभरात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाल्याने आता आरोग्य आणि आर्थिक व्यवस्था नाजूक झाली आहे. दरम्यान या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासावरही बंदी घालण्यात आल्याने कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली येत आहे. दरम्यान काही महिन्यांपासून रशिया आणि सौदी अरेबियामध्येही इंधनदर युद्ध पहायला मिळाले होते.

ANI Tweet 

इंधनाच्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी झाल्याने दर घसरत आहेत. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांवरही पहायला मिळत आहे. भारत, कॅनडा, दक्षिण कोरिया यांसह जगातील सुमारे 44 देशांना अमेरिकेकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे सारेच घरात अडकून पडल्याने वाहतूक मंदावली आहे.