Sensex | Photo Credits: File Photo

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील अर्थव्यवस्था आणि त्यांच्या जागतिक बाजारपेठांना बसल्याचं पहायला मिळालं आहे. आज (21 एप्रिल) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येही बाजार उघडताच निफ्टी आणि सेंसेक्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. दरम्यान आज सेंन्सेक्स 813.90अंकांनी घसरून 30,834.80 वर पोहचला आहे. तर निफ्टीमध्येही 251.10 अंकांची घसरण झाल्याने ती देखील 9,010.75 पर्यंत खाली आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटातही जगभर बाजार सावारण्यास सुरूवात झाली होती. मात्र इतिहासात पहिल्यांदा महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकावर गेल्याने त्याचा परिणाम शेअर बाजरावरही पहायला मिळत आहे.

अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स सोबतच मिडकॅप शेअर्समध्ये आज मंदी पहायला मिळाली आहे. बीएसई चा मिड कॅप इंडेक्स 0.89% खाली आला आहे. स्मॉल कॅप शेअर्समध्येही निराशा पहायला मिळाली आहे. ते सुमारे0.14% नी खाली आले आहेत. तर तेल-गॅस शेअर्समध्येही आज मोठी निराशा आहे. बीएसईचे ऑईल अ‍ॅन्ड गॅस इंडेक्स सुमारे 2.78% ने खाली आलेले पहायला मिळाले आहेत.

मुंबई शेअर बाजरात आज मोठी निराशा आहे. बॅंकेवरही दबाव असल्याने आता बॅंक निफ्टीमध्ये 3.38% घसरण पहायला मिळाली आहे.

PTI Tweet

ओएनजीसी, बजाज फायनांन्स, गेल, इंडसइंड बॅंक, वेदांता लिमिटेड, हिंडाल्को, आईसीआईसीआई बॅंक, टाटा मोटर्स, एक्सिस बॅंक, मारुती चे शेअर्स घसरले आहेत. आज प्री ओपन दरम्यानदेखील शेअर मार्केट लाल निशाणावर उघडलं. सेंसेक्समध्ये 2.57% तर निफ्टीमध्ये 2.64% नी घसरण झाल्याने शेअर बाजाराची आजची सुरूवात निराशाजनक झाली आहे.