Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्रीय संघाचा फुटबॉलपटू झाकी अनवारीचा (Zaki Anwari) सोमवारी काबूल विमानतळावर (Kabul Airport) अमेरिकन विमानातून (US Plane) पडून मृत्यू झाला, अशी माहिती अफगाणिस्तानची वृत्तसंस्था एरियाना यांनी गुरुवारी दिली. रविवारी तालिबानी (Taliban) बंडखोरांनी सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती, अनेकांनी नागरिक चालत्या विमानात चढण्याचा प्रयत्न करताना पहिले गेले. एरियाना म्हणाले की, झाकी अनवारी USAF Boeing C-17 वरून खाली पडला आणि क्रीडा महासंचालनालयाने मृत्यूची पुष्टी केली. (Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्थानात तालिबानांच्या प्रवेशानंतर अर्थव्यवस्था कोलमडली, अमेरिकेनेही 74.26 हजार कोटींची विदेशी रक्कम केली जप्त)
तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी, काबुल, ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशाबाहेर जाण्याच्या आशेने आलेल्या झालेल्या हजारो अफगाणांपैकी अनवारी एक होता. तो C-17 विमानावर चढला होता जो काबुलहून रवाना होणार होता. झाकी हा अफगाणिस्तानचा तरुण फुटबॉलपटू होता. सोमवार, 16 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. तो अमेरिकेच्या लष्करी विमानातून खाली पडला. झाकीच्या मृत्यूची घोषणा अफगाणिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघाने 18 ऑगस्ट रोजी फेसबुक पोस्टद्वारे केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी क्रीडा संचालनालयाने या वृत्ताला दुजोरा दिला. 16 ऑगस्ट रोजी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भयानक दृश्याचा एक व्हिडिओ समोर आला. अमेरिकन हवाई दलाचे लष्करी विमान टेकऑफसाठी पुढे जात असताना, लोकांची गर्दी रनवेवर विमानाच्या मागे धावत होती. काही जण विमानाच्या चाकांवर लटकले किंवा पंखांवर बसले. विमान उड्डाण करण्यापूर्वी काही लोक टायर्सच्या वरच्या जागेवर चढले. जेव्हा विमान उंचीवर पोहोचले तेव्हा लोकांचा तोल गेला आणि आकाशातून पडून तीन जणांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचे मृतदेह घरांच्या छतावर सापडले.
एएनआयचे ट्वीट-
#WATCH: "Takeover of Kabul by Taliban on eve of 20th anniversary of 9/11 would be remembered as historic...One of the passengers that fell from flying airplane was reportedly from Afghan National Football team...," Davood Moradian, Director, Afghan Institute for Strategic Studies pic.twitter.com/vpTCN1ZjyQ
— ANI (@ANI) August 19, 2021
तालिबानी पासून बचाव करण्यासाठी शेकडो निर्वासितांना घेऊन हे अमेरिकी विमान पुढे जात होते. अमेरिकेच्या हवाई दलाच्या सी-17 वाहतूक विमानात झाकी अनवारीचे अवशेष सापडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, काबुल विमानतळावरून नवीन व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये महिला दरवाजे आणि काटेरी तारांबाहेरून मदतीसाठी ओरडताना दिसत आहे आणि सैन्याला आत जाण्याची विनंती करत आहेत. व्हिडिओमध्ये, महिलांना "आम्हाला मदत करा, तालिबानी येत आहेत," असे बोलता ऐकले जाऊ शकते.