Afghanistan Crisis: राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानच्या भीतीने नागरिकांची धावपळ, विमानतळासह रस्त्यावर तुफान गर्दी
राष्ट्रपतींनी सोडला देश (Photo Credits ANI)

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी हे रविवारी देश सोडून पळाले. मीडियाच्या हवाल्याने अशी बातमी दिली जात आहे की, ताजिकिस्तान मध्ये ते सध्या आहेत. गनी यांनी देश सोडल्यानंर तालिबान कमांडरांनी अफगाणच्या राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले आहे. राष्ट्रपती गनी यांनी देश सोडल्यानंतर आता स्थानिक लोक हे तालिबान्यांना घाबरुन काबुल येथून पलायन करत आहेत. विमानतळ ते रस्त्यांवर नागरिकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. लोक सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रस्त्यांवर हजारो नागरिक दिसून येत आहेत. ही लोक देश सोडण्यासाठी मार्ग शोधत आहेत. अन्य हजारो लोक ही राजधानीत असलेल्या एकाच पासपोर्ट कार्यालयाबाहेर लांबच्या लांब रांगेत उभी आहेत.(Afghanistan: अफगाणिस्तानवर असणार आता तालिबानचे वर्चस्व, अशरफ गनी यांनी अली अहमद जलाली यांना सोपवली सत्ता- सुत्र)

राष्ट्रपती गनी यांनी देश सोडल्यानंतर अफगाणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी एक ऑनलाईन व्हिडिओ जाहीर केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, गनी यांनी देश सोडून जावे. गनी यांनी कठीण काळात अफगाणिस्तान सोडले, देव त्यांना जबाबदार ठरवेल. नागरिक याच भीतीमुळे देश सोडू पाहत आहेत की, तालिबान पुन्हा क्रुर शासन लागू करेल. ज्यामध्ये महिलांचा अधिकार संपुष्टात येईल.

याच दरम्यान, तालिबानने रविवारी राजधानी काबुल मध्ये प्रवेश करत त्यांनी देशावर वर्चस्व मिळवल्याची घोषणा केली. आता ते अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात आहे. प्रेस असोसिएशनने तालिबान अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनातून ही घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक पत्रकार बिलाल सरवारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी थेट चर्चेत सहभागी असलेल्या दोन अफगाणिणींशी बोलले, कराराचा एक भाग असा होता की घनी राजवाड्यात सत्ताबदल कार्यक्रमाला उपस्थित राहतील, परंतु त्याऐवजी ते आणि त्यांचे वरिष्ठ सहाय्यक देश सोडून गेले.