South africa violence: दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरुंगात टाकल्याने उफाळला हिंसाचार, 72 जणांचा गेला नाहक बळी
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरुंगात टाकल्यावर झालेल्या हिंसाचारात सुमारे 72 जण ठार झाले आहेत. यामध्ये सोमवारी रात्री सोवेटो येथील शॉपिंग सेंटरमध्ये लूटमारीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बीबीसीने मंगळवारी दिली आहे. या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.

डर्बनमधील इमारतीतून फेकल्या जाण्याऱ्या एका बाळाला बीबीसीने चित्रण केले आहे. तळ मजल्यावरील दुकाने लुटल्यानंतर त्यांना आग लावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्वत्र अशांतता पसरण्यानंतर पोलिसांच्या अधिक मदतीसाठी आता सैन्य दलाला तैनात करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दंगल भडकवल्याच्या संशयास्पद 12 लोकांना ओळखले होते आणि एकूण 1,234 लोकांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी या घटनेला दक्षिण आफ्रिकेत 1990च्या दशकापासून घडलेला आतापर्यंतचा सर्वात भयंकर हिंसाचार म्हटले आहे. वर्णभेदाच्या समाप्तीआधी क्वाझुलू-नताल आणि गौटेन्ग प्रांतातील प्रमुख शहरे आणि छोट्या शहरांमध्ये व्यवसाय आणि गोदामे लुटली गेली. मात्र आता यानंतर उपासमारीची वेळ इथल्या लोकांवर येण्याची भीती येथील मंत्र्यांनी दर्शवली आहे. जर या भागात अशीच लूटमार सुरू राहिली तर तीन मुलभूत गरजांचा पुरवठा होण्यास धोका निर्माण होऊ शकतो. सोमवारी दुपारपर्यंत 200 हून अधिक शॉपिंग सेंटरची लूटमार करण्यात आली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांचे घर असलेल्या शहरात मोठी तोडफोड केली गेली आहे. तेथील एटीएम, रेस्टॉरंट, तसेच इतर सर्व दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

काही भागात तर दंगलखोरांनी चक्क रुग्णवाहिकेवर हल्ला चढवला असल्याचे समोर आले आहे. तसेच डर्बन येथील रक्तपेटी लुटून नेतानाचा व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यातील काही दंगलखोरांना पकडण्यात पोलीस आणि सैन्यदलाला यश आले आहे. याप्रकरणी सुमारे 800 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र यासर्व व्यक्तींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. ही संपुर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन कसून प्रयत्न करत आहे.