Butter Chicken (PC - Wikimedia Commons)

Man Died After Eating Butter Chicken Curry: इंग्लंड (England) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. बटर चिकन करी (Butter Chicken Curry) खाल्लाने एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जेवणादरम्यान घरात बनवलेल्या बटर चिकनचा एक घास खाल्यानंतर या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. प्राप्त माहितीनुसार, चिकन करीमध्ये नट होते, ज्यामुळे एलर्जीची प्रतिक्रिया निर्माण झाली. जोसेफ हिगिन्सन यांना काजू आणि बदामाची ऍलर्जी होती. या आजाराला ॲनाफिलेक्सिस असे म्हणतात. ही एक जीवघेणी ऍलर्जी प्रतिक्रिया आहे.

डिजिटल न्यूज पोर्टल मिररने दिलेल्या वृत्तानुसार, हिगिन्सन यांनी बटर चिकन करी खाल्ली. त्यांना यात अक्रोड असल्याचं माहिती होतं. त्यांनी यापूर्वी अक्रोड, बदाम आणि काजू असलेले पदार्थ खाल्ले होते. त्यावेळी त्यांच्या शरीराने ते सहनही केले होते. यापूर्वी समस्यांशिवाय नट-आधारित पदार्थ खाल्लेले असूनही, बदाम असलेली फक्त एक खास बटर चिकन करी खाल्ल्यानंतर हिगिन्सनला जीवघेण्या अॅलर्जीला सामोरे जावे लागले. (हेही वाचा - Fatal 'Parrot Fever' Outbreak: प्राणघातक 'पॅरोट फिव्हर'मुळे युरोपात 5 जणांचा मृत्यू; WHO ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या काय आहे Psittacosis आजार, त्याची लक्षणे व इतर माहिती)

हिगिन्सन ॲनाफिलेक्सिस या आजाराला बळी पडले. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास केला. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हिगिन्सनला त्याच्या ऍलर्जीबद्दल माहिती होती. खाण्यापूर्वी हिगिन्सनने डिशची काळजीपूर्वक तपासणी केली होती. त्यांची बहीण, एमिली हिगिन्सनने या एलर्जीला गांभीर्याने घेण्याच्या महत्त्वावर जोर देत सांगितले की, ॲलर्जी असलेल्या लोकांनी नेहमीच परिस्थिती गांभीर्याने घेतली पाहिजे. हे गृहीत धरले जाऊ शकत नाही. अॅलर्जीची तीव्रता एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्यात बदलू शकते. (हेही वाचा: Covid-19 Vaccine: काय सांगता? पठ्ठ्याने तब्बल 200 वेळा घेतली कोरोनाची लस; शास्त्रज्ञांनाही बसला धक्का, संशोधन सुरु)

हिगिन्सनला त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी ऍलर्जीचे निदान झाले होते. त्यांच्याकडे ऍलर्जीक प्रतिक्रियांचा प्रतिकार करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होते. हिगिन्सनवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, हिगिन्सनची स्थिती वेगाने खराब झाली.