अमेरिकेत 25 लाखाहून अधिक लोकांना COVID-19 ची लागण तर 1,25,000 लोक कोरोनाचे बळी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला असून जगभरात आतापर्यंत 1 कोटीच्या वर लोकांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यात अमेरिकेत (USA) आतापर्यंत कोरोनाचे एकूण 25,00,419 रुग्ण आढळले आहेत. तर 1,25,000 लोक दगावले असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. हा आकडा फारच धक्कादायक असून या विकसित देशासाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. जगभरात आतापर्यंत एकूण 1 कोटी 82 हजार 613 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यात आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोक दगावल्याची माहिती वर्ल्डओमीटरर्सने दिली आहे.

संपूर्ण जगाचा विचार केला असता आतापर्यंत 54 लाख 58 हजार 523 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझील, रशिया, भारत आणि युनायटेड किंग्डम मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. Coronavirus Vaccine: 'कोरोनावरील लस मिळण्यास एक वर्ष लागणार', WHO प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेससचा दावा

ब्राझील आतापर्यंत 13,15,941 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ रशियामध्ये 6,27,646 कोरोनाचे रुगण आहेत. तर भारतात 5 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

वैज्ञानिकांचा अंदाज आहे की कोविड-19 (COVID-19) वरील लस येत्या वर्षभरापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी मिळू शकेल असा जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दावा केला आहे. ही लस विकसित, उत्पादन आणि वितरणात जागतिक सहकार्याचे महत्त्व देखील त्यांनी सांगितले.