दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाकिस्तान येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.स्पाईसजेटच्या एसजी-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पाकिस्तान येथील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पाइसजेट B737 विमान SG-11 कराचीला वळवण्यात आले.