SBI ने त्याचा MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) 10 बेस पॉइंट्स म्हणजे 0.1 टक्क्यांनी वाढवला आहे. कर्जदरातील ही वाढ सर्व कालावधीसाठी लागू आहे. बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांना कर्ज घेणे महाग होणार असून त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.