Online | Pixabay.com

स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून Clerk (Junior Associate) recruitment exam चा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. उमेदवार त्यांचा निकाल एसबीआय ची अधिकृत वेबसाईट वर पाहू शकतात. preliminary exam ही देशभर 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आता परीक्षेच्या निकालाचे वेध लागले आहेत.

पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार 10 एप्रिल 2025 दिवशी होणाऱ्या SBI Clerk Mains Exam ला सामोरे जातील. निकालांसोबतच, SBI Clerk scorecard देखील जारी करेल, ज्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या विषयानुसार गुणांची माहिती असेल. निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात. यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी यांचा समावेश आहे. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांचा अंतिम नियुक्तीसाठी विचार केला जाईल.

SBI Clerk Result 2025 डाऊनलोड कसा कराल?

  • SBI Clerk (Junior Associate) चा निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
  • SBI ची website - sbi.co.in ला भेट द्या.
  • ‘Recruitment of Junior Associates (Customer Support & Sales) (Tentative Date for Main Examination: 10.04.2025)’या खाली असलेल्या रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • आता तुमचे login credentials टाका.
  • आता स्क्रिनवर निकाल दिसेल. तुमचा SBI Clerk result तुम्ही सेव्ह करून डाऊनलोड देखील करू शकता.

(नक्की वाचा: India Post GDS Result 2025: भारतीय डाक विभागातील नोकरभरती साठी महाराष्ट्र विभागाचा निकाल जाहीर; indiapostgdsonline.gov.in वर पहा यादी) .

एसबीआय क्लर्क निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेत प्रवेश करतात, जी एकूण गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी निश्चित करते. मुख्य परीक्षेत सामान्य/वित्तीय जागरूकता, इंग्रजी, परिमाणात्मक अभियोग्यता आणि तर्क आणि संगणक अभियोग्यता समाविष्ट असते. पात्रता प्राप्त केल्यानंतर, उमेदवारांनी अंतिम निवडीपूर्वी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.