
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक नोकरभरती 2025 चा निकाल ( India Post GDS Result 2025) indiapostgdsonline.gov.in या डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज केला आहे त्यांना आता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. मेरीट लिस्टची पीडीएफ देण्यात आली आहे. indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईट वर हा निकाल पाहता येणार आहे. सध्या Haryana, Jammu & Kashmir, Jharkhand, आणि Maharashtra विभागाचे निकाल जाहीर झाले आहे. 21,413 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना Rs 10,000 ते Rs 29,380 पगार मिळणार आहे.
India Post GDS result 2025 चा निकास कसा पहाल?
- indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेज वर India Post GDS merit list ची लिंक पहा.
- ड्रॉप डाऊन मेन्यू वर क्लिक करून तुमचं राज्य निवडा.
- आता लिंक वर क्लिक करा आणि एक पीडीएफ ओपन होईल.
- India Post GDS result 2025 PDF मध्ये सविस्तर तपशील असेल. यामध्ये डिव्हिजन, पदाचे नाव, रजिस्टर नंबर आणि documents to be verified दिसतील.
महाराष्ट्र विभागाची मेरीट लिस्ट इथे पहा थेट.
दरम्यान इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक नोकरभरती मध्ये कोणतीही लेखी परीक्षा, मुलाखत झालेली नाही. दहावीच्या मार्कांच्या आधारे ही मेरीट लिस्ट बनवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 10 फेब्रुवारी ते 3 मार्च राबवण्यात आली होती. त्याच्या आधारे आता निकाल लावण्यात आला आहे.