
भारतामध्ये 1 एप्रिल पासून प्रमुख बॅंकांमध्ये मिनिमम बॅलेन्सशी निगडीत नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम आता थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), कॅनरा बँक आणि इतर बँकांनी त्यांच्या बचत खात्यांमधील किमान शिल्लक आवश्यकता सुधारित केल्या आहेत. नक्की वाचा: Rules Change from 1st April 2025: 1 एप्रिलपासून होणार आहेत 'हे' 5 मोठे बदल! काय होईल तुमच्यावर परिणाम? जाणून घ्या .
किमान बॅलेन्सची मर्यादा
किमान बॅलेन्स ची नवी मर्यादा बनवण्यात आली आहे. आता ग्राहकांसाठी शहरी, निम शहरी आणि ग्रामीण भागातील मर्यादा वेगवेगळी असणार आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये हा किमान बॅलेन्स अधिक असणार आहे.
दंड अधिक
जर बॅंकेच्या ग्राहकांनी किमान बॅलेन्स ठेवला नाही तर त्याला दंड आकारला जाणार आहे. हा दंड देखील बॅंक आणि खात्याच्या प्रकारानुसार वेगवेगळा आहे.
बॅंक व्यवहाराबद्दल लक्षात ठेवा
आपल्या बॅंकेच्या स्थानिक शाखेच्या ग्राहक सेवेला नव्या किमान बॅलेन्स नियमाबद्दल विचारा. तितकी रक्कम तुमच्या बॅंकेच्या खात्यामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तसेच दंड टाळण्यासाठी वेळोवेळी तितकी रक्कम अकाऊंट मध्ये राहील याची तजवीज करून ठेवा. बॅंकेच्या ऑनलाईन बॅकिंग सेवा वापरून आवश्यक किमान बॅलेंस वर लक्ष ठेवू शकता.
1 मे पासून आता एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे, कारण रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम इंटरचेंज चार्जेस वाढवण्याची परवानगी दिली आहे. आता दरमहा एटीएममधून मोफत पैसे काढण्याची संख्या मर्यादित करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना खर्च वाढेल, विशेषत: जेव्हा ते दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरतात.