हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभरात येणाऱ्या सणांना विशेष महत्त्व आहे. कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीला 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणून संबोधले जाते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पूर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी हा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराला काही खास शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करता येईल