दिवाळीची सांगता खर्या अर्थाने त्रिपुरारी पौर्णिमेला (Tripurari Pournima) देव दिवाळी (Dev Diwali) साजरी करून केली जाते. देव दिवाळी ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. यंदा हिंदूधर्मीय 26 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत आहेत. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देत हा दिवस खास करायला WhatsApp, Facebook, Instagram च्या माध्यमातून ग्रीटिंग्स शेअर करू शकता. कार्तिकी पौर्णिमा यंदा दोन दिवसात विभागून आली आहे.
कार्तिक मासात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते. अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दु:ख पाहावले नाही आणि त्यांनी अखेर त्रिपुरासूराचा वध केला.अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. Dev Deepawali 2023 Date: देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व .
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा
त्रिपुरारी पौर्णिमा ही देवदिवाळी म्हणून देखील साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे मोठे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, ही तारीख सृष्टीच्या सुरुवातीपासून खूप खास आहे. पुराणांमध्ये, हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. त्याचे महत्त्व केवळ वैष्णव भक्तांसाठीच नाही तर शैव भक्तांसाठीही आहे.