काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे नामकरण करण्यास मंजुरी दिली आहे.