Uddhav Thackeray- Raj Thackeray | (Photo Credit- X/ANI)

Uddhav-Raj Political Alliance: युट्युबवर प्रसारित पॉडकॉस्टमधील संवादावेळी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याशी संवाद साधताना महाराष्ट्राचे राजकारण नव्यावळणाने घेऊन जाण्याचे संकेत दिले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) यांच्यातील संभाव्य युती किंवा सामंजस्याबद्दल चर्चा वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज या दोन्ही भावंडांनी एकत्र यावे अशी साद घालणारी पोस्टर्स (Mumbai Posters) झळकलीआहेत. मांजरेकर यांच्याशी बोलताना राज यांनी "कोणत्याही सहकार्याने राजकीय फायद्यापेक्षा महाराष्ट्राच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे यावर भर दिला आहे', त्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज नेमके काय म्हणाले, याबातब घ्या जाणून.

बंधुंकडून साद-प्रतिसाद

महेश मांजरेकर यांच्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, 'माझ्यासाठी, महाराष्ट्राचे हित आहे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर राज्याला फायदा झाला तर मी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्यास तयार आहे. पण, प्रश्न असा आहे की - ते देखील तयार आहेत का?, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शिवसेना (UBT) कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला आणि म्हटले की, 'कोणत्याही प्रतिसादास माझ्याकडून काहीच नकार नाही. जे काही मतभेद होते, जे माझ्याकडून नव्हतेच कधी, ते सर्व विसरुण जायला मी तयार आहे. पण, जे महाराष्ट्रद्र द्रोही आणि शिवसेनेचे गद्दार आहेत त्यांना घरी बोलावून श्रीखंड, आमरस पुरी खाऊ घालणे बंद करणार आहात का?' दरम्यान, यावर मनसेकडून अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया आली नाही. (हेही वाचा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पहा दोन्ही ठाकरेंची भूमिका काय)

मनसे नेत्यांनी उगळला भूतकाळातील कोळसा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना (UBT)-मनसे संभाव्य युतीबाबत सावध भूमिका घेतली. त्यांनी मनसेकडून या आधी झालेले प्रयत्न आणि उद्धव यांच्या पक्षाकडून मिळालेला कथीत धोका यावर प्रकाश टाकाला. त्यांनी म्हटले की, 2017 मध्ये, संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. देशपांडे यांनी प्रश्न केला, 'मुख्यमंत्री असताना मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या 17,000 खटल्यांसाठी उद्धव ठाकरे माफी मागतील का?' (हेही वाचा, Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट)

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटले की, 'माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे, परंतु प्रश्न आहे की तेही तयार आहेत का?'

उद्धव ठाकरे यांची अट

उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मी देखील मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी भांडणे बाजूला ठेवण्यास तयार आहे. पण त्याने (राज ठाकरे) महाराष्ट्रविरोधी लोक आणि पक्षांशी संबंध ठेवू नये.'​

दरम्यान, जुने मतभेद विसरुन दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र यावेत असे मुंबईकर आणि सेना (UBT), मनसे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे मुंबईत दोन्ही बंधुंनी एकत्र यावे यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देत पोस्टर्स झळकावली आहेत. ज्यामध्ये उद्धव, राज आणि दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकत्र आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, दोन्ही पक्षांची एकजूट महत्त्वपूर्ण ठरू शकते. मात्र, भूतकाळातील वाद आणि विश्वासाचा अभाव ही एकजूट साध्य करण्यात अडथळा ठरू शकतात.