जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. बांदीपोराच्या नदीहाल भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर सैन्याने ही मोठी कारवाई केली. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्याचे नाव मेहबूब-उल-इनम असे असून तो नदीहालचा रहिवासी आहे. दहशतवाद्याकडून तीन एके रायफल, 10 मॅगझिन, 380 राउंड, दोन किलोग्रॅम स्फोटक साहित्य आणि एक चिनी ग्रेनेड, गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.