Jammu Kashmir Encounter:  24 तासांत जम्मू-काश्मीराच्या एन्काऊंटरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा, ऑपरेशनला मोठं यश
Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Jammu Kashmir Encounter: जम्मू-कश्मीरात अतिरेक्यांना भारतीय लष्करांनी ठार केले आहे. कुलगाम येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये शुक्रवारी पाच अतिरेकींना कंठस्नान घातले आहे. त्यानंतर राजौरीमध्ये एक अतिरेकी ठार झाला आहे. माहितीनुसार, राजौरीमध्ये अतिरेक्यांचे एन्काऊंटर सुरु आहे. हे एक मोठं ऑपरेशन आहे ज्याला यश मिळाले आहे. कुलगाव येथे दहशतवादी लपलेल्याची माहिती मिळताच गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशनमध्ये 4 एके सीरीज रायफल, 2 पिस्तूल, 4 ग्रेनेड आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले आहे.

16 नोव्हेंबरच्या सायंकाळी कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. ही शोध मोहिमे सुरु असताना सुरक्षा दलाच्या सैनिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. लष्कराचे 34व्या राष्ट्रीय रायफल्स, 9 पॅरा (एलिट स्पेशल फोर्स युनिट), सीआरपीएफ आणि राज्य पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईत लष्कर- ए – तोयबाचे पाच अतिरेकी ठार झाले.

कुलगामच्या नेहमा गावात दहशतवादी घरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गावात सुरक्षा वाढवण्यात आली. दहशतवाद्यांना समजताच त्यांनी गोळीबार सुरु केला. सैन्यांनी गोळीबार सुरु केला त्याच पाच जण ठार झाले.