Photo Credit- X

Gunfight in Jammu and Kashmir: काश्मीरमधील कुलगाम येथे आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. घटनास्थळी पोलीस आणि लष्कर तैनात आहे. काही वेळा तेथे गोळीबाराची घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन ते तीन दहशतवादी तेथे लपले असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी ठार )

दुसरीकडे, पोलिसांनी शुक्रवारी अवंतीपोरा, पुलवामा येथे दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 आयईडी, 30 डिटोनेटर, 17 आयईडीच्या बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राऊंड, 4 हँडग्रेनेड आणि 20,000 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तरुणांचा संघटनेत समावेश करूण घेण्यासाठी त्यांचा शोध घेत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. दहशतवादी अशा तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना शस्त्रे आणि दारूगोळा देण्याचे प्रशिक्षण देणार होते. तरुणांच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी या तरुणांच्या मदतीने आयईडी पेरण्यासाठी काही ठिकाणेही निवडली होती. त्या तरुणांना हँडलर आणि आयईडी बनवण्यासाठी पैसेही देण्यात आले, जेणेकरून ते यासाठी साहित्य आणू शकतील.

तरुणांना दहशतवादी गटात सामील होणे सोपे व्हावे यासाठी त्यांना पिस्तूल, ग्रेनेड, आयईडी देण्यात आले. तरुणांना दहशतवादी गटात सामील करण्यापूर्वी टार्गेट किलिंग, एसएफ, सार्वजनिक ठिकाणी ग्रेनेड फेकणे, बिगर काश्मिरी मजूर आणि आयईडी स्फोट यांसारख्या दहशतवादी कारवाया करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.