Enconter

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच दहशतवादी ठार झाले. "कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले. हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले जात आहे,” एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कुलगामच्या दमहल हांजी पोरा भागात ही चकमक सुरू झाली, असे काश्मीर झोन पोलिसांनी एक्सवर पोस्ट केले. ( Delhi Air Quality: दिल्लीची हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत, येत्या काही दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच)

पाहा पोस्ट -

गुरुवारी या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्याने शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. कुलगामच्या नेहामा भागातील सामनो येथे रात्रभर शांततेनंतर शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. त्यांचा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.