Kulgam Encounter: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुलगाम जिल्ह्यात (Kulgam District) गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी (Terrorists) ठार झाले. या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कादरमध्ये संशयित दहशतवाद्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध आणि घेराबंदी केली.
दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त -
लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टनुसार यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद आणि मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत यासिर जावेद, आदिल हजाम, मुश्ताक इटू, इरफान लोन, आसिफ शेख यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी गुप्तचर आधारित ऑपरेशन सुरू केल्यानंतर गुरुवारी रात्री सुरू झालेल्या चकमकीनंतर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. (हेही वाचा -Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार)
Five #terrorists neutralized in Kulgam anti-terrorist operation. Identification being ascertained. Search operation continues. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/JmA4u1zXOc
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 19, 2024
दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर विशेष टास्क फोर्स तैनात -
या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधील दाचीग्राम भागात लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी चकमकीत ठार झाला होता. जुनेद अहमद भट या दहशतवाद्याचा गगनगीर, गांदरबल आणि इतर ठिकाणी नागरिकांना लक्ष्य केलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर देशातील दहशतवादी विरोधी गट राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) तैनात केला आहे. त्यांनी गेल्या महिन्यात विशेष टास्क फोर्स तैनात करण्याचे आदेश दिले होते.