Encounter In Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील नारायणपूर जिल्ह्यात (Narayanpur District) गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाले. पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त पथकाने राबविलेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेदरम्यान दक्षिण अबुझमादच्या जंगलात पहाटे तीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. या ऑपरेशनमध्ये नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि CRPF च्या तुकड्यांचा समावेश होता. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
#WATCH | Chhattisgarh: On 7 Naxalites killed in the forest of Southern Abujhmad, Chhattisgarh Deputy Chief Minister Vijay Sharma says, "Today, action is taken on the basis of information... In the last 5 years, 219 Naxalites were killed and this year 220 Naxalites have been… pic.twitter.com/WrQZd9OEhT
— ANI (@ANI) December 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)