भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेनंतर भारतीय टीम आपल्या मायदेशी परतली आहे. मायदेशात परतल्यानंतर गाबा कसोटी गाजवणारा शार्दूल ठाकूर आपल्या मूळ गावी पालघर माहीम येथे परतला. तिथे पोहोचल्यावर शार्दुलच्या आईने औक्षण करून त्याचं घरात स्वागत केले, माहीम गावानेही त्याचे जंगी स्वागत केले.