LSG vs MI, IPL 2025 16th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्सला आणि मुंबई इंडियन्स थोड्याच वेळात येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकाॅर्ड (LSG vs MI Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, लखनौ सुपर जायंट्सने वरचढ कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते आणि दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले होते. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
लखनौ सुपर जायंट्सचा स्टार फलंदाज एडेन मार्करामला टी-20 क्रिकेटमध्ये 4,500 धावा पूर्ण करण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा घातक फलंदाज निकोलस पूरनला आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरला टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी पाच विकेट्सची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सचा घातक गोलंदाज ट्रेंट बोल्ट टी-20 क्रिकेटमधील त्याचा 250 वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

