LSG vs MI, IPL 2025 16th Match Key Players: लखनौ सुपर जायंट्सला टक्कर देण्यासाठी मुंबई इंडियन्स उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Key Players: लखनौ सुपर जायंट्सला टक्कर देण्यासाठी मुंबई इंडियन्स उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
LSG vs MI (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकाॅर्ड (LSG vs MI Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, लखनौ सुपर जायंट्सने वरचढ कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते आणि दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले होते. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.

हे देखील वाचा: LSG vs MI, IPL 2025 16th Match Winner Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

मिचेल मार्श: लखनौ सुपर जायंट्सचा घातक फलंदाज मिचेल मार्शने गेल्या 10 डावांमध्ये 322 धावा केल्या आहेत. या काळात मिचेल मार्शने 145.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मिचेल मार्शचे परफेक्ट टायमिंग आणि क्लासिक शाॅट्स लखनौच्या बाजूने सामना वळवू शकतात.

ऋषभ पंत: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा ऋषभ पंत लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.

रवी बिश्नोई: लखनौ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज रवी बिश्नोईने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. रवी बिश्नोईची अचूक आणि फिरकी फलंदाजांना त्रास देऊ शकते.

सूर्यकुमार यादव: मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या 10 डावांमध्ये 381 धावा केल्या आहेत. यादरम्यान, सूर्यकुमार यादवने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचे परफेक्ट टायमिंग आणि क्लासिक शाॅट्स सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवू शकतात.

ट्रेंट बोल्ट: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने गेल्या नऊ सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टची अचूक गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2025 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).