बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

LSG vs MI, IPL 2025 16th Match Winner Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Winner Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
LSG vs MI (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकाॅर्ड (LSG vs MI Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, लखनौ सुपर जायंट्सने वरचढ कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते आणि दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले होते. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.

हे देखील वाचा: LSG vs MI IPL 2025 16th Match Lucknow Pitch Report: एकाना स्टेडियमवर फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? कोणाचे असणार वर्चस्व? सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल

कोणता संघ जिंकणार आजचा सामना?

या सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, लखनौ सुपर जायंट्स संघाचा वरचष्मा दिसतो, ज्यामध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघ हा वाईट रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. तथापि, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सामन्यात काहीही भाकित करणे कठीण आहे.

मुंबई इंडियन्स जिंकण्याची शक्यता: 45%

लखनौ सुपर जायंट्सच्या विजयाची शक्यता: 55%

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई, प्रिन्स दीपका यादव/आकाश दीप

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार आणि विघ्नेश पुथूर/सत्यनारायण राजू

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2025 06:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel